ब्रेट लीचं भारतीय मुलीशी लग्न अशक्य?

ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली 'अनइंडियन' या सिनेमात काम करतोय. त्याला भारतीय मुलीशी लग्न करायचंय. पण तो अनइंडियन असल्याने, मुलीचे आई-वडिल राजी नाहीत.

Updated: Sep 27, 2015, 08:10 PM IST
ब्रेट लीचं भारतीय मुलीशी लग्न अशक्य? title=

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली 'अनइंडियन' या सिनेमात काम करतोय. त्याला भारतीय मुलीशी लग्न करायचंय. पण तो अनइंडियन असल्याने, मुलीचे आई-वडिल राजी नाहीत.

ब्रेट लीची भूमिका अनइंडियन या सिनेमात आपल्याला पाहता येणार आहे, हा सिनेमा १५ ऑक्टोबर रोजी रिलीज होतोय. होय, ब्रेट ली 'अनइंडियन' सिनेमातून अभिनयाच्या इनिंगची सुरुवात करत आहे.

सिनेमाची कहाणी तशी रंजक आहे. मीराने भारतीय वंशाच्या मुलासोबत लग्न करावं, अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा आहे. विनोदी आणि काही बोल्ड सीनद्वारे वेगवेगळ्या संस्कृतीतील दोन व्यक्ती प्रेम आणि लग्नासाठी कुटुंबियांना कसं राजी करतात, अशी या सिनेमाची कहाणी आहे.

या सिनेमाची शूटिंग सिडनीत पार पडलं, चित्रपटात ब्रेट लीच्या अपोझिट तनिष्ठा चॅटर्जी दिसणार आहे. तनिष्ठा एका घटस्फोटित महिला मीराची भूमिका साकारत आहे, जी विल म्हणजेच ब्रेट ली यांच्या प्रेमात ती प्रेमात पडते.

ब्रेट लीचं भारतीय मुलीशी लग्न अशक्य?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.