'घायल वन्स अगेन'ची पहिल्या दिवसात ७.२० कोटींची कमाई

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला अभिनेता सनी देओलचा 'घायल वन्स अगेन' हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.२० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओलने केले असून मुख्य भूमिकेतही तोच आहे. 

Updated: Feb 7, 2016, 12:28 PM IST
'घायल वन्स अगेन'ची पहिल्या दिवसात ७.२० कोटींची कमाई title=

मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला अभिनेता सनी देओलचा 'घायल वन्स अगेन' हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.२० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओलने केले असून मुख्य भूमिकेतही तोच आहे. 

१९९० मध्ये सनीचा घायल हा सिनेमा रिलीज झाला होता. त्याचाच हा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनीसह रिषभ अरोरा, शिवम पाटील, डायना खान आणि आंचल मुंजाल यांच्या भूमिका आहेत. 

हा एक अॅक्शनपट चित्रपट असून सनीसोबत सोहा अली खान, ओम पुरी आणि टिस्का चोप्रासारखे कलाकार आहेत.