... आणि जेनेलिया दु:खात बुडाली!

जेनेलिया डीसुझा-देशमुख सध्या दु:खात बुडालीय. आपल्या एका जवळच्या जीवाला गमावल्यानं ती आठवणींत बुडालीय. 

Updated: Jan 13, 2016, 01:13 PM IST
... आणि जेनेलिया दु:खात बुडाली! title=

मुंबई : जेनेलिया डीसुझा-देशमुख सध्या दु:खात बुडालीय. आपल्या एका जवळच्या जीवाला गमावल्यानं ती आठवणींत बुडालीय. 

'लाएका' हा जेनेलियाचा अत्यंत जवळचा आणि लाडका कुत्रीनं या जगाचा निरोप घेतलाय. काळ्या-पांढऱ्या रंगाच्या लाएकाच्या आठवणींना उजाळा देताना जेनेलियानं आपला एक जुना फोटो सोशल वेबसाईट 'ट्विटर'वर शेअर केलाय.

या फोटोत जेनेलिया आपल्या वेडिंग गाऊनमध्ये 'लायका'ला कुरवाळताना दिसतेय. 'लाएका तू आम्हाला सोडून गेलीस... अशीच.. आमचं घर तुझ्याविना कायम अपूर्ण राहील... लव्ह यू सो मच' असं जेनेलियानं याफोटोसोबत म्हटलंय.