अभिनेत्री डायना हेडन झाली 'मॅजिक' आई

आठ वर्षांपूर्वी जतन करून ठेवलेल्या बीजामधून डायना हेडन हिला अपत्य प्राप्ती झाली. मातृसौख्य लाभल्याने विश्वसुंदरी आनंदीत आहे.

Updated: Jan 13, 2016, 02:22 PM IST
अभिनेत्री डायना हेडन झाली 'मॅजिक' आई title=

मुंबई : आठ वर्षांपूर्वी जतन करून ठेवलेल्या बीजामधून डायना हेडन हिला अपत्य प्राप्ती झाली. मातृसौख्य लाभल्याने विश्वसुंदरी आनंदीत आहे.

८ वर्षांपासून जतन करून ठेवलेल्या स्त्रीबिजातून ४२ वर्षीय माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री डायना हेडन हिला मुलगी झाली आहे. तिचं नाव 'आर्या' असं ठेवण्यात आलंय. 

करिअर करण्यामध्ये व्यस्त असल्यानं आणि लवकर लग्न करण्याची इच्छा नसल्यानं २००७-२००८ च्या दरम्यान डायना हेडननं आपले स्त्रीबीज डॉ नंदीता पालशेतकर यांच्या सहाय्यानं फ्रिजींग करून ठेवले होते. कारण वय वाढेल तसं महिलांमधील स्त्रीबीजाचे प्रमाण कमी होत जाते. यामुळं  चाळीशीनंतर अपत्यप्राप्ती होण्यात मर्यादा पडतात. 

दोन वर्षापूर्वी अमेरिकन नागरिक कॉलीन डिक याच्याशी डायनानं लग्न केल्यानंतर तिनं अपत्यप्राप्तीचा निर्णय घेतला. यावेळी तिच्या मदतीला आले ते ८ वर्षांपासून जतन करून ठेवलेले स्त्रीबीज. डॉ नंदिता पालशेतकर यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालंय.