एकता कपूरचे फेक अकाऊंट, अभिनेत्रीला घातला ७ लाखाला गंडा

फेसबूकवर एकता कपूरच्या नावाचे एक बनावट अकाऊंट काढून एका महिलेने टेलिफिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका अभिनेत्रीला चक्क ७ लाख रुपयांना गंडा घातला.

Updated: Dec 4, 2015, 06:12 PM IST
एकता कपूरचे फेक अकाऊंट, अभिनेत्रीला घातला ७ लाखाला गंडा title=

मुंबई : फेसबूकवर एकता कपूरच्या नावाचे एक बनावट अकाऊंट काढून एका महिलेने टेलिफिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका अभिनेत्रीला चक्क ७ लाख रुपयांना गंडा घातला.

एकता कपूरच्या नावे फेक अकाऊंट तयार करून टेलिफिल्ममध्ये काम देण्याचा बहाणा करत एका तोतया महिलेने अंजली भदौरिया या अभिनेत्रीला फसविले. तोतया महिलेने बनावट नावाने काढलेल्या एकता कपूर बॅंक खात्यात अभिनेत्रीने चक्क ७ लाख रुपये भरले. मात्र, तिला काही काम मिळाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे तिच्या लक्षात आले. अंजलीने बालाजी टेलिफिल्मच्या कार्यालयाच चौकशी केली असता आपण फसवलो गेल्याचे तिच्या लक्षात आले.

त्यानंतर तिने माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी बालाजी टेलिफिल्म्सचे कर्मचारी प्रतिक यांनी २ डिसेंबरला वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात या सायबर गुन्ह्याची तक्रार दिली. निर्मात्यांकडून अशा प्रकारची कोणतीही जाहिरात दिली गेली नसल्याचे प्रतिक यांनी स्पष्ट केले. तसेच अंजली यांनी आपल्याकडून रिक्वेस्ट सुद्धा सेंड केली गेली नसल्याचे असे प्रतिकने स्पष्ट केलेय.

दरम्यान, तोतया महिला फेसबूक युजरने आपण बालाजी टेलिफिल्मचे कर्मचारी असल्याची बतावणी करत अंजीलीला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली. त्यानंतर त्या दोघींचे बोलणे होत होते. अभिनेत्रीला वाटले की आपण एकता कपूरशी बोलत आहोत. मात्र, ते फेक अकाऊंट होते. दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला. बॅंकेकडून महत्वाची माहिती हाती लागल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.