वीकेंडला चार सिनेमांची मेजवानी

वीकेंडला बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी तर दोन मराठी सिनेमे प्रदर्शित झालेयेत. हिंदीमध्ये अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर स्टारर मिर्झिया हा सिनेमात प्रदर्शित झालाये. 

Updated: Oct 7, 2016, 07:49 AM IST
वीकेंडला चार सिनेमांची मेजवानी title=

मुंबई : वीकेंडला बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी तर दोन मराठी सिनेमे प्रदर्शित झालेयेत. हिंदीमध्ये अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर स्टारर मिर्झिया हा सिनेमात प्रदर्शित झालाये. 

राकेशओमप्रकाश मेहरांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून गुलजार यांनी सिनेमाची कथा लिहीलीये. त्यामुळे या सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सोनू सुद आणि प्रभुदेवाची प्रमुख भूमिका असलेला 'तुतक तुतक तुतिया' हा सिनेमाही प्रदर्शित झालाये. 

दुसरीकडे मराठीत गिरीश कुलकर्णीचं दिग्दर्शन असलेला जाऊ द्या ना बाळासाहेब हा सिनेमाही प्रदर्शित झालाये. या सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज असल्यामुळे सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

याबरोबरचं वंदना गुप्तेंची पहिली निर्मिती असलेला 'फॅमिली कट्टा' हा सिनेमाही प्रदर्शित झालाये. त्यामुळे यामध्ये आता कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.