व्हिडिओ : कतरिना आणि आदित्यच्या 'फितूर'चा ट्रेलर लॉन्च

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी पहिल्यांदाच 'फितूर' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय. 

Updated: Jan 5, 2016, 09:17 AM IST
व्हिडिओ : कतरिना आणि आदित्यच्या 'फितूर'चा ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी पहिल्यांदाच 'फितूर' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय. 

अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात आदित्यला एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'फितूर' चित्रपटाच ट्रेलर पाहिल्यानंतर कदाचित तुम्हालाही हे जाणवेल. 

या चित्रपटात अभिनेत्री तब्बूही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसतेय.

काय पो छे आणि रॉक ऑन या चित्रपटांसाठी अभिषेक कपूरला ओळखलं जातं. 'फितूर'चा ट्रेलर पाहून 'हैदर' या सिनेमाची आठवण तुम्हाला होऊ शकते.