VIDEO : आदित्य कतरिनाला म्हणतोय, तेरे लिये...

यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांना भूलवून टाकण्यासाठी सज्ज झालाय. 

Updated: Jan 21, 2016, 11:32 AM IST

 

मुंबई : यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'फितूर' प्रेक्षकांना भूलवून टाकण्यासाठी सज्ज झालाय. 

याच सिनेमातील आणखीन एक गाणं 'तेरे लिये' नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. हे गाणं सुनिधी चौहान आणि जुबिन नौटियाल यांनी गायलंय. या गाण्यात आदित्य - कतरिनाची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळतेय. 

यापूर्वी या सिनेमाचं ये फितूर मेरा आणि पश्मिना या गाण्यांनाही प्रेक्षकांनी अगोदरच उचलून धरलंय. 

या सिनेमात आदित्य - कतरिनाशिवाय तब्बूचीही मुख्य भूमिका आहे. तब्बू एक कतरिनाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा १२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.