एकता कपूरच्या 'XXX'चं पोस्टर प्रदर्शित

वादग्रस्त 'एआयबी' व्हिडिओ लोकांना पसंत पडला नसेल तर एकता कपूरच्या आगामी सिनेमा 'XXX'चं काय? असा प्रश्न आता समोर आलाय. कारण, नुकतंच एकताच्या या आगामी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Feb 18, 2015, 10:36 AM IST
एकता कपूरच्या 'XXX'चं पोस्टर प्रदर्शित  title=

मुंबई : वादग्रस्त 'एआयबी' व्हिडिओ लोकांना पसंत पडला नसेल तर एकता कपूरच्या आगामी सिनेमा 'XXX'चं काय? असा प्रश्न आता समोर आलाय. कारण, नुकतंच एकताच्या या आगामी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. 

या पोस्टरमध्ये द्विअर्थी संवाद वापरले गेलेत. त्यामुळे, या सिनेमात काय पाहायला मिळेल याचा अंदाज आत्तापर्यंत तुम्हाला आलाच असेल. 

'व्हॅलेन्टाईन्स डे छोड अब सिर्फ पलंग तोड' असं वाक्य 'XXX'च्या पहिल्याच पोस्टरवर लिहिलं गेलंय. 

सिनेमाच्या पोस्टरवर वापरण्यात आलेला पलंगाचा फोटोही वादग्रस्त ठरू शकतो. या सिनेमात असलेल्या बोल्ड कन्टेन्टमुळे सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा झेंडा मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. 

हा सिनेमा केन घोष यांनी दिग्दर्शित केलाय. 2016 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.