लेडी गागा झाली 'एन्गेज'!

पॉप स्टार लेडी गागानं अखेर आपण नात्यात अडकल्याचं जाहीर केलंय. 'शिकागो फायर'चा अभिनेता टेलर किन्नी याच्यासोबत लेडी गागा 'एन्गेज' झालीय. 

Updated: Feb 17, 2015, 06:43 PM IST
लेडी गागा झाली 'एन्गेज'! title=

लॉस एन्जेलिस : पॉप स्टार लेडी गागानं अखेर आपण नात्यात अडकल्याचं जाहीर केलंय. 'शिकागो फायर'चा अभिनेता टेलर किन्नी याच्यासोबत लेडी गागा 'एन्गेज' झालीय. 

यूएस मॅगझीननं दिलेल्या बातमीनुसार, 'व्हॅलेन्टाईन डे' निमित्तावर 33 वर्षीय टेलरनं लेडी गागासमोर विवाहाचा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. 


लेडी गागा

गागानं एका हिऱ्यांच्या अंगठीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 'व्हॅलेन्टाईन डेवर त्यानं त्याचं हृदय मला सोपवलं आणि मीही होकार दिला' असं लेडी गागानं यावर म्हटलंय. यानंतर या जोडप्यानं मॅनहॅट्टनच्या अप्पर वेस्ट साईडस्थित एका रेस्टॉरन्टमध्ये हा दिवस साजराही केला.  

लेडी गागा आणि टेलर किन्नी यांची पहिली भेट 'यू अॅन्ड आय' या म्युझिक व्हिडिओच्या सेटवर 2011 साली झाली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.