विद्या बालनच्या पहिल्या मराठी चित्रपटाचं पोस्टर लॉन्च

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही आता मराठी चित्रपटामध्ये एन्ट्री करत आहे.

Updated: May 29, 2016, 06:45 PM IST
विद्या बालनच्या पहिल्या मराठी चित्रपटाचं पोस्टर लॉन्च title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही आता मराठी चित्रपटामध्ये एन्ट्री करत आहे. एक अलबेला या मराठी चित्रपटातून विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. चित्रपट समिक्षक तरन आदर्श यांनी हे पोस्टर ट्विटरवरून शेअर केलं आहे. 

या पोस्टरमध्ये विद्या साडीमध्ये मराठमोळ्या मुलगी दिसत आहे. या चित्रपटामध्ये विद्या गीता बालीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. 

विद्यानं भालो ठेको हा बंगाली चित्रपटातून विद्यानं पदार्पण केलं होतं. यानंतर तिनं हमारी अधुरी कहानी, कहानी, परिनिता आणि इश्किया यांसारखे बॉलीवूडमधले हिट चित्रपट केले आहेत. 

भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित असलेला एक अलबेला हा चित्रपट शेखर सरतांडेल यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट या जूनमध्ये प्रदर्शित होईल, अशी शक्यता आहे.  

पाहा एक अलबेलाचा लूक