ऐश्वर्या रायच्या 'जज्बा'चा फर्स्ट लूक

अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहिलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन पुनरागमनासाठी सज्ज झालेय. तिच्या आगामी 'जज्बा' या सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे.

Updated: May 19, 2015, 05:39 PM IST
ऐश्वर्या रायच्या 'जज्बा'चा फर्स्ट लूक title=

मुंबई : अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहिलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय - बच्चन पुनरागमनासाठी सज्ज झालेय. तिच्या आगामी 'जज्बा' या सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे.

दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या 'जज्बा' या आगामी चित्रपटाचा पहिले पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

'जज्बा' चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या शिर्षकाला साजेसा ऐश्वर्याचा 'जज्बा' लूक पोस्टरमध्ये दिसत आहे. 'कान'मध्ये सुरु असलेल्या ६८ व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील 'जज्बा' चे स्क्रिनिंग होणार आहे.

ऐश्वर्यासह संजय गुप्ता आणि या चित्रपटातील सहअभिनेता इरफान खान देखील स्क्रिनिंगला उपस्थित असणार आहे. इरफान खानसोबत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि शबाना आझमी यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.