मुंबई : बॉलिवूडच्या एका खान विरोधात १८ अभिनेत्रींवर अश्लिल वक्तव्य केल्याची तक्रार दाखल केली आहे. वकील रिज़वान यांनी मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्थानकात कमल रशीद खान म्हणजेच केआरके विरोधात तक्रार दाखल केली आहे. 'केआरकेने 2012 पासून फेब्रुवारी 2016च्या दरम्यान जवळपास १८ अभिनेत्रींवर अश्लिल ट्विट केलं आहे आणि त्यांना त्रास दिला आहे. ज्यामध्ये सनी लियॉन, परिणिती चोपडा, कॅटरिना कॅफ, असिन, अमिषा पटेल, लीसा हेडन, मल्लिका शेरावत, वाणी कपूर, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, प्रियंका चोपडा आणि नरगिस फखरी यांचा समावेश आहे.
या प्रकरणाचं गांभिर्य लक्षात घेत KRK विरोधात शुक्रवारी पोलिसात IPC च्या 276/16, 354, 354A, 354C, 354 D आणि 509 नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. नॅशनल वुमन कमिशन, महाराष्ट्र स्टेट वुमन कमिशनने देखील KRK वर करवाईची मागणी केली आहे. KRK वर मात्र याचा कोणताच परिणाम होतांना दिसत नाही आहे. त्याने ट्विट केलं आहे की, माझ्या विरोधात १०० तक्रार दाखल करा तरी मला काही फरक पडत नाही. मी सगळ्यांचा बाप आहे.' KRKची याबाबत चौकशी होणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. जर त्याचं असंच वर्तन राहिलं तर त्याच्या अडचणी वाढू शकतात.