मुंबई : बॉलीवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 62 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात आमिर खानचा दंगल सिनेमाने सर्वाधिक पुरस्कारांवर मोहोर उमटवली.
आमिर खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर उडता पंजाबमधील अभिनय़ासाठी आलिया भटला पुरस्कार देण्यात आला. दंगल सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. तर दिग्दर्शनचा पुरस्कारही दंगलच्या नितेश तिवारी यांना देण्यात आला.
पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपट - दंगल
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमिर खान, दंगल
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट, उडता पंजाब
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - नितेश तिवारी, दंगल
समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सोनम कपूर, नीरजा
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- दिलजीत दुसान, उडता पंजाब
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री - हृतिका सिंग, साला खडूस
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ऋृषी कपूर, कपूर अॅण्ड सन्स
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - शबाना आझमी, नीरजा
सर्वोत्कृष्ट अभिनेता (लघुपट) - मनोज वाजपेयी, तांडव
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन- फिक्शन) - मातीतली कुस्ती
सर्वोत्कृष्ट लघुपट (फिक्शन) - ज्योती कपूर दास, चटनी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लघुपट) - तिस्का चोप्रा, चटनी
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - अश्विनी अयेर तिवारी, निल बटे सन्नाटा
सर्वोत्कृष्ट संवाद - रितेश शाह, पिंक
सर्वोत्कृष्ट पटकथा - शक्तुन बत्रा आणि अयेशा देवित्रे, कपूर अॅण्ड सन्स
सर्वोत्कृष्ट कथा - शक्तुन बत्रा आणि अयेशा देवित्रे, कपूर अॅण्ड सन्स
सर्वोत्कृष्ट गीतकार - अमिताभ भट्टाचार्य, ऐ दिल है मुश्कील
सर्वोत्कृष्ट म्युजिक अल्बम - प्रितम, ऐ दिल है मुश्कील
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरजित सिंग, ऐ दिल है मुश्कील
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - नेहा भासिन, सुलतान
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट - रेड चिलीज्, फॅन
सर्वोत्कृष्ट इडिटिंग - मोनिशा बालदावा, नीरजा
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - पायल सलुजा, उडता पंजाब
सर्वोत्कृष्ट अॅक्शन - श्याम कौशल, दंगल