फिल्म रिव्ह्यू : शाहिद-आलियासाठी 'उडता पंजाब' थिएटरमध्येच पाहा...

आज बिग स्क्रिनवर अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेला, चर्चेत असलेला, वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बहुप्रतिक्षित असा 'उडता पंजाब' हा सिनेमा आज बिग स्क्रिनवर झळकलाय. 

Updated: Jun 17, 2016, 01:36 PM IST
फिल्म रिव्ह्यू : शाहिद-आलियासाठी 'उडता पंजाब' थिएटरमध्येच पाहा...  title=

जयंती वाघधरे, मुंबई : आज बिग स्क्रिनवर अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेला, चर्चेत असलेला, वादाच्या भोवऱ्यात सापडलेला बहुप्रतिक्षित असा 'उडता पंजाब' हा सिनेमा आज बिग स्क्रिनवर झळकलाय. 

सिनेमाची ट्रु स्टोरी...

पंजाबमध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध पॉप सिंगर टॉमी सिंग या व्यकितरेखेवर आधारित हा सिनेमा आहे. अभिनेता शाहिद कपूरनं ही भूमिका पार पाडली आहे. या तरुणाला नशेचं व्यसनं लागलंय. हा एक प्रसिद्ध गायक असल्यामुळे अनेक तरुण त्याला फॉलो करतात... त्याच्या पावलावर पाऊल टाकून त्याच्यासारखे बनू पाहतात... 

दुसरीकडे डॉक्टर प्रीत साहनी अर्थातच करिना कपूर आणि पंजाब पोलीस दलात काम करणारा सरताज सिंग ही दोन पात्र नशेच्या या व्यवसायला कायमचं मुळापासून संपवण्यासाठी कार्य करतायत... 

नशेच्या व्यवसाय करणाऱ्या टोळीत काही कारणामुळे फसलेली बिहारी मुलगी अशी व्यक्तिरेखा पार पाडली आहे अभिनेत्री आलिया भट्टनं...

तेव्हा नशेचा हा संपूर्ण व्यवसाय अजून किती बळी घेणार? याचा नायनाट होणार का? अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे.

रिअल लोकेशन्स... 

'उडता पंजाब' या सिनेमाचा विषय पूर्णपणे 'ड्रग्स' या विशयावर लक्ष केद्रीत करतो. सिनेमातली पात्रं ही याच प्रकारे रंगवण्यात आलेत. सिनेमाचा पूर्वाध चांगला आहे. सिनेमाचा उत्तरार्धही बऱ्यापैंकी चांगला झालाय. मात्र, काही ठिकाणी सिनेमा लांबलाय. पण, खरं तर 'उडता पंजाब' या सिनेमाचा जो फ्लेवर आहे त्यासाठी याची गरज होती, हे सिनेमा पाहताना जाणवतं. 'उडता पंजाब' ज्या ज्या ठिकाणी चित्रीत करण्यात आलाय, ते लोकेशन्स रियल आहेत. ज्यामुळे सिनेमा आणखी रियल वाटतो.

अभिनय आणि कलाकार

शाहीद कपूरनं रंगवलेला 'टॉमी' चांगला झालाय... त्याचा अभिनयही सुंदर झालाय... दुसरीकडे आलिया भट्टनं या सिनेमात कमाल केलीय. तिचा लूक, तिचा गेटअप, तिचा अभिनय तो लहेजा लाजवाब वाटतो. काही क्षणासाठी ही आलिया भट्टच आहे का? असा प्रश्न सिनेमा पाहताना पडतो. अभिनेत्री आलियासाठी हा सिनेमा नक्की पाथब्रेकर ठरणार आहे यात शंका नाही. अभिनेत्री करिना कपूरनं आणि अभिनेता दलजीत या दोघानीही आपआपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत.

या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही या सिनेमाला देतोय ३.५ स्टार्स...