फिल्म रिव्ह्यू : ट्विस्ट अॅन्ड टर्न्सचा 'हाफ गर्लफ्रेंड'

 चेतन भगत याच्या कादंबरीवर आधारित याआधी थ्री इडियट्स, टू स्टेट्स, थ्री मिस्टेक्स ऑफ माई लाइफ, वन नाइट एट कॉल सेंटर असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनले आहेत..

Updated: May 19, 2017, 04:57 PM IST
फिल्म रिव्ह्यू : ट्विस्ट अॅन्ड टर्न्सचा 'हाफ गर्लफ्रेंड'  title=

सिनेमा : हाफ गर्लफ्रेंड

दिग्दर्शक : मोहीत सुरी

कलाकार : अर्जुन कपूर, श्रद्धा कपूर

वेळ : 135 मिनिटे 

जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : चेतन भगत याच्या कादंबरीवर आधारित याआधी थ्री इडियट्स, टू स्टेट्स, थ्री मिस्टेक्स ऑफ माई लाइफ, वन नाइट एट कॉल सेंटर असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनले आहेत... आणि ते बऱ्यापैंकी यशस्वीही ठरले. त्याच्याच 'हाफ गर्लफ्रेंड' या कांदबरीवर आधारित याच नावाचा सिनेमा मोहित सुरी यांनी दिग्दर्शित केलाय.  

दिग्दर्शक मोहित सुरी ज्यांनी याआधी 'आशिकी 2' आणि 'एक व्हिलन' सारखे हिट सिनेमे दिलेत. यांनीच 'हाफ हर्लफ्रेंड' या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. बिहारी मुलगा आणि दिल्लीची मुलगी या दोघांची ही गोष्ट... दिल्लीच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये, दोघांची भेट होते. बास्केटबॉलच्या निमित्तानं दोघांच्या भेटी गाठी वाढत जातात... रिया आणि माधव अशी या पात्रांची नावं... माधवचं इंग्रजी जरा कच्चं असल्यामुळे, सगळेच त्याची खिल्ली उडवतात. पुढे सिनेमात असा काही ट्विस्ट येतो की रिया आणि माधव एकमेकांपासून दूर होतात... आणि मग काय घडतं यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल... 

या सिनेमात तुम्हाला गरजेपेक्षा जास्त ट्विस्ट अॅन्ड टर्न्स पहायला मिळतात.. ज्यामुळे एका पॉइंटनंतर सिनेमा बोरींग होत जातो. सिनेमातले संवादही कमजोर जाणवतात... 'हाफ गर्लफ्रेंड'चं स्क्रिनप्ले ही अनेकदा खटकतं... स्ट्रेट टू द पॉइंट सांगायचं झालं तर सिनेमाची मांडणी फसलीय. प्रेक्षकांना प्रभावीत करण्यात हा सिनेमा मागे पडताना दिसतो. 

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर या दोघांचाही अभिनय ठिकठाक आहे. सिनेमाचं संगीत आणि बॅकग्राउंड स्कोर छान झालंय. 'मैं फिर भी तुमको चाहुंगा' आणि 'बारीश' ही या सिनेमातील गाणी श्रवणीय झाली आहेत. 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमाचं बजट जवळपास 35 कोटींचं असून, सिनेमाचे डिजीटल आणि सॅटलाईट राईट्स आधीपासून विकले गेलेत. तेव्हा 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता या सिनेमाला आम्ही देतोय 2 स्टार्स...