फिल्म रिव्ह्यू : अक्षय कुमारचा थ्रीलिंग 'बेबी'

'अ वेन्सडे' आणि 'स्पेशल २६' असे हटके सिनेमे देणारा दिगदर्शक निरज पांडे आता अक्षय कुमार स्टारर 'बेबी' हा थ्रीलर सिनेमा घेऊन आलाय.

Updated: Jan 23, 2015, 06:01 PM IST
फिल्म रिव्ह्यू : अक्षय कुमारचा थ्रीलिंग 'बेबी' title=

 

सिनेमा : बेबी
दिग्दर्शक : निरज पांडे
कलाकार : अक्षय कुमार, अनुपम खेर, राणा डग्गुबाती, मधुरिमा तुली, डॅनी, के के मेनन, सुशांत सिंग, रशिद नाझ
वेळ : १५९ मिनिट 

मुंबई : 'अ वेन्सडे' आणि 'स्पेशल २६' असे हटके सिनेमे देणारा दिगदर्शक निरज पांडे आता अक्षय कुमार स्टारर 'बेबी' हा थ्रीलर सिनेमा घेऊन आलाय.

कथानक : 
२६/११च्या टेरर अटॅक नंतर दहशतवादाशी लढण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली जाते. या टीमला लीड करतो अक्षय कुमार अर्थातच अजय सिंग राजपूत हा अधिकारी... अतिरेक्यांशी २४ X ७ लढण्यासाठी ही टीम सतत कार्यरत आहे.  यात एटीएस चीफ फिराज अली खानची भूमिका साकारलेल्या डॅनी डेनझोप्पा या टीमचं वर्णन करायला एक डायलॉग म्हणतो... 'हमको कुछ सरफिरे ऑफिसर्स मिल ही जाते हैं... जो देश के लिए मरना नहीं जिना चाहते है' 

अभिनय :
'बेबी' या सिनेमात अक्षय कुमारनं पुन्हा एक नवा बेन्चमार्क सेट केलाय. त्य़ाचा अभिनय लाजवाब झालाय. अक्षय बरोबरच डॅनी आणि अनुपम खेर या दोघांनीही आपआपल्या व्यक्तिरेखा चोखपणे पार पाडल्या आहेत. 

शेवटी काय तर...
'अ वेन्सडे' असो 'स्पेशल २६'... असो किंवा बेबी दिगदर्शक निरज पांडेनं पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलंय. या सिनेमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे याचं दिगदर्शन... एक थ्रीलर सिनेमा असावा तर असा... या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही या सिनेमाला देतोय चार स्टार्स...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.