Video - ‘एक अलबेला’चा फर्स्ट लूक, बुंबाट गर्ल विद्या बालन मराठी

दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या जीवनावरील ‘एक अलबेला’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री विद्या बालन काम करत आहे. ती प्रथमच मराठी सिनेमात दिसणार आहे.

Updated: Jan 28, 2016, 05:34 PM IST
Video - ‘एक अलबेला’चा फर्स्ट लूक, बुंबाट गर्ल विद्या बालन मराठी title=

मुंबई : दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या जीवनावरील ‘एक अलबेला’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री विद्या बालन काम करत आहे. ती प्रथमच मराठी सिनेमात दिसणार आहे.

मंगेश देसाई या चित्रपटात भगवानदादांची भूमिका साकारतोय. तर गीता बालींच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे. टिझरमध्ये मंगेश देसाई भगवानदादांच्या प्रसिद्ध नृत्याच्या स्टेप्स करतानाही दिसतो. या चित्रपटातील विद्या बालनचा लूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे.

काही दिवसांपूर्वीच मंगेश देसाई आणि विद्या बालन यांच्यावर ‘शाम ढले खिडकी तले’ या गाण्याचे काही चित्रीकरण तसेच अन्य काही दृश्यांचे चित्रीकरण मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीत करण्यात आलेय.

व्हिडिओ :