मुंबई : 'बिग बॉस'चे अनेक सीझन वेगवेगळ्या सेलिब्रिटिंच्या हॉट अदांमुळे गाजले. विशेषत: बॉलिवूड बाला आणि मॉडल्स या कार्यक्रमाचं आकर्षण ठरल्या... त्या त्यांच्या हॉट अदांमुळे आणि अंगप्रदर्शनामुळे...
यंदाच्या सीझनमध्ये अनेक बाला होत्याच की... त्यातही शेवटपर्यंत या कार्यक्रमात टिकून राहिलेल्या मंदनाच्या काही हॉट अदा कार्यक्रमात पाहायला मिळतील अशी अपेक्षा काहींना होती. शिवाय, बाहेर 'क्या कूल है हम ३' या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू होतं. या सिनेमात तिचे बोल्ड सीन्स दिसत होते. त्यामुळे, या अपेक्षा आणखी उंचावल्या. पण, मंदनानं मात्र या अपेक्षा फोल ठरवल्या.
आपण हे जाणून बुजून केलं... आणि आपण असं का केलं... याचं उत्तर आता मंदनानं दिलंय. तुम्ही एखाद्या सिनेमात काम करता तेव्हा तुमच्या प्रेक्षकांना काय पाहायचंय यावर ते अवलंबून असतं. ड्रामा सिनेमा असेल तर तुम्ही ड्रामा कराल, अॅक्शन असेल तर अॅक्शन आणि अडल्ट कॉमेडी असेल तर बोल्ड सीन्स... पण, बिग बॉस या कार्यक्रम हा तुमच्या व्यक्तीमत्वाबद्दल आहे... आणि मी या कार्यक्रमात माझ्याशी प्रामाणिक राहिले... आणि मी जशी आहे तशीच राहिले, असं मंदनानं म्हटलंय.