हेमा मालिनीच्या स्टेजवर तळीरामचा धुमाकूळ

 मथुराच्या खासदार हेमा मालिनी या सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 3, 2017, 10:46 PM IST

मथुरा : मथुराच्या खासदार हेमा मालिनी या सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मथुरेत एक प्रचार सभा होती, त्यावेळी एका ज्येष्ठ नागरीक स्टेजवर चढला आणि हेमा मालिनी यांच्यासमोर जाऊन उभा राहिला. 

काही करून ते खाली उतरायला तयार नव्हते, तेव्हा एका कार्यकर्त्याने त्यांना हाताला धरून खाली उतरवलं. यानंतर आश्चर्याने पाहत असलेल्या हेमा मालिनी यांच्या रॅलीला पुन्हा सुरूवात झाली. संबंधित व्यक्ती नशेत असल्याचं सांगितलं जात आहे.