व्हिडिओ : अजय देवगणच्या 'दृश्यम' या सिनेमा ट्रेलर लॉन्च

 मोठ्या ब्रेकनंतर अभिनेता अजय देवगण नव्याने सिनेमात पदार्पण करीत आहे. त्याचा नवा 'दृश्यम' हा सिनेमा येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. 

Updated: Jun 6, 2015, 02:23 PM IST
व्हिडिओ : अजय देवगणच्या 'दृश्यम' या सिनेमा  ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : मोठ्या ब्रेकनंतर अभिनेता अजय देवगण नव्याने सिनेमात पदार्पण करीत आहे. त्याचा नवा 'दृश्यम' हा सिनेमा येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. 

सिनेमाचा ट्रेलर तीन मिनिटांचा आहे. या ट्रेलरमध्ये अजय देवगण सामान्य नागरिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण 'दृश्यम' हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री आहे.सिनेमात श्रिया सरन अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

अजयच्या कुटुंबावर अपहरणाचा आरोप लागतो. ज्या मुलाचं अपहरण होतं, तो तब्बूचा मुलगा असतो. 'दृश्यम'मध्ये तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.