लग्नाच्या प्लॅनिंगला लागले दीपिका-रणवीर!

 बॉलिवुडचे राम-लीला रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळेस बातमी अशी आहे की, दीपिका आणि रणवीर लग्नाची प्लॅनिंग करीत आहेत. एका जवळच्या सूत्रांनी सांगितले की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. 

Updated: Aug 7, 2014, 01:01 PM IST
 लग्नाच्या प्लॅनिंगला लागले दीपिका-रणवीर! title=

मुंबई :  बॉलिवुडचे राम-लीला रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळेस बातमी अशी आहे की, दीपिका आणि रणवीर लग्नाची प्लॅनिंग करीत आहेत. एका जवळच्या सूत्रांनी सांगितले की, दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. 

रणवीर सिंग हा दीपिकाशी आपल्या नात्याबाबत खूपच सिरीअस आहे. दीपिकाने लग्नाला होकार दिला तर त्या दोघांचे शुभमंगल २०१५च्या अखेरपर्यंत हे दोघे लग्नाची बेडीत अडकतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका कॅज्युअल फ्रेंडशीपने हे नाते सुरू झाले. नंतर हळूहळू ते दोघे सिरिअस झालेत. सिरिअस इतके की  फायडिंग फॅनी या चित्रपटात दीपिका पदुकोणत्या पतीच्या एका छोट्या भूमिकेसाठीही रणवीरने होकार दिला. 

दोघांनी खुलेआम स्वीकारले की त्यांचे प्रेम आता कोणापासून लपून राहिले नाही. आता दोघांच्या लग्नाच्या बातमीने गॉसिपच्या गल्ल्यांमध्ये खळबळ माजवली आहे. 
दरम्यान दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या नात्याबद्दल काही कनफर्मेशन दिले नाही. पण, ज्या प्रकारे दुसऱ्या चौथ्या दिवशी त्यांच्या गॅटमॅटच्या बातम्या प्रसिद्ध होतात. त्यावरून त्यांच्यात काहीतरी सुरू आहे हे नक्की. हे दोघे स्टार बऱ्याच वेळा एकमेकांसोबत टाइम स्पेंड करताना दिसते आहेत. त्याच्या फ्रेंडशीपपेक्षा अधिक स्पष्ट दिसून येत आहे.  

रामलीला सारख्या हिट फिल्मनंतर दोघे संजय लीला भंसाळी यांच्या बाजीराव मस्तानी यात लीड रोलमध्ये दिसणार आहेत. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की २०१५ पर्यंत दीपिका आणि रणवीर बॅचलर राहतात की नाही.... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.