मुंबई : बॉलिवुडमधील चित्रपट ‘सिंघम रिटर्न्स’मधील गाणे ‘आता माझी सटकली’ ला आतापर्यंत २० लाख नेटीझन्सने भेट दिली आहे. अभिनेत्री करिना कपूर आणि अजय देवगणवर चित्रीत झालेले हे गाणे बऱ्याच लोकांना आवडते आहे. या गाण्यात यो यो हनी सिंगही दिसत आहे.
गाणे ऐकायला जबरदस्त आहे आणि लोकांचाही याला पसंती दिसून येत आहे. यो यो हनी सिंग याने पहिल्यांना मराठीत गाणे म्हटले आहे. त्याने गाण्यामध्ये मराठीत रॅप केला आहे. गाण्याचे चित्रीकरणही जबरदस्त करण्यात आले आहे.
मराठी माणसांसाठी सर्वात इंटरेस्टिंग विषय म्हणजे अजय देवगणसोबत पोलिसाच्या वर्दीतील एका लहान मुलाचा डान्स आणि त्याची ‘आता माझी सटकली’ ही अक्शन जबरदस्त पॉप्युलर होत आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.