'मराठी तर मला लई आवडली'

बॉलीवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी कोल्हापूरकरांना आपलंस केलं आहे. 'मी घरातसुद्धा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करते... मला लई आवडतं'... असं डिंपल कपाडिया यांनी म्हटलं आहे.

Updated: Mar 13, 2016, 08:41 PM IST
'मराठी तर मला लई आवडली' title=

कोल्हापूर : बॉलीवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी कोल्हापूरकरांना आपलंस केलं आहे. 'मी घरातसुद्धा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करते... मला लई आवडतं'... असं डिंपल कपाडिया यांनी म्हटलं आहे.

यावेळी उपस्थित महिलांनीही त्यांच्या या वक्तव्याला प्रचंड प्रतिसाद दिला. कोल्हापूर महापालिका आणि डी. वाय. पाटील शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थेच्या वतीने मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

केशवराव भोसले नाट्यगृहात डिंपल यांचे रंगमंचावर आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आपले सोनेरी केस सावरत भाषणासाठी उठलेल्या डिंपल यांना महिलांनी टाळ्यांची सलामी दिली. 

सर्वसामान्य महिलांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम आपल्याला आवडला, आयुष्यात एखाद्याला तरी आपण उभं करू शकलो तरी त्याचं वेगळं समाधान मनाला मिळतं. तेच काम इथं सुरू असल्याचा आनंद असल्याचं कापडीया यांनी यावेळी सांगितलं.