मुंबई: ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार न्यूमोनियामुळं आजारी असून त्यांना शनिवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना कफ आणि थंडीचा त्रस होतोय.
त्यांच्यावर प्रतिजैवकांद्वारे उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असून अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेलं नाही, असं डॉ. जलील पारकर यांनी सांगितलं. डॉक्टर म्हणाले त्यांना अँटीबायोटिक्स औषधं देतोय. ९१ वर्षीय दिलीप कुमार यांना गेल्यावर्षी हृदयविकाराचा झटका आल्यानं हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं होतं.
दिलीज कुमार यांनी ‘किंग ऑफ ट्रॅजिडी’ म्हणून ओळखलं जातं. त्यांनी देवदास, मधुमति, मुगल-ए-आझम आणि गंगा जमुना सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.