बिग बॉसमधून बाहेर पडलेली प्रेग्नेंट डियांड्रा आता मोठा पडद्यावर

प्रेग्नेंट असल्याच्या कारणावरून बिग बॉसच्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली डियांड्रा सोरेस आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. ती नविन वर्षात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Updated: Dec 20, 2014, 08:10 PM IST
बिग बॉसमधून  बाहेर पडलेली प्रेग्नेंट डियांड्रा आता मोठा पडद्यावर title=

मुंबई : प्रेग्नेंट असल्याच्या कारणावरून बिग बॉसच्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली डियांड्रा सोरेस आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. ती नविन वर्षात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

डियांड्रा बिग बॉसच्या घरात वादात अडकल होती. डियांड्रा ही एक मॉडेल आहे. सध्या तिच्याकडे दोन चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती पूजा भट्ट करणार आहे. डियांड्राने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘सध्या माझ्याकडे दोन चित्रपट आहेत, या दोन्ही सिनेमांची निर्मिती पूजा भट्ट करणार आहे.
यातील एका चित्रपटाचे दिग्दर्शन सोनी राजदान करतील. हा चित्रपट सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये चित्रीत होणार होता; पण मी नशीबवान आहे. कारण हा चित्रपट आता फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू होणार आहे. गौतम गुलाठी सोबत नाव जोडली गेलेली डिआंड्राचे चित्रपटातील हे पहिलचं पाऊल आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.