'ढोलताशे' निर्माते अतुल तापकीर यांची आत्महत्या

मराठी सिनेनिर्माता अतुल तापकीर यांनी आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडलीये. 

Updated: May 14, 2017, 04:21 PM IST
'ढोलताशे' निर्माते अतुल तापकीर यांची आत्महत्या title=

मुंबई : मराठी सिनेनिर्माता अतुल तापकीर यांनी आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडलीये. 

याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट लिहित आत्महत्या करण्यामागचे कारण सांगितलेय. अतुल तापकीर यांनी ढोलताशे या सिनेमाची निर्मिती केली होती. 

या सिनेमाला अपयश मिळाल्यानंतर कर्जबाजारीपण आला होता. तसेच पत्नीच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.