मुंबई : बॉलीवूडचा हीमॅन धमेंद्र यांचं दु:ख काय असू शकेल?, धमेंद्र दु:खी आहे, यावर आपला विश्वास बसू शकत नाही, मात्र धमेंद्र म्हणतात, भारतीय फिल्म इंडस्ट्रीला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. यात माझं करिअर ५५ वर्षांचं आहे, मात्र जेव्हा सिनेमाला १०० वर्ष पूर्ण होण्यावर बोललं जातं, तेव्हा माझ्याविषयी कुणीच काही बोलत नाही.
मात्र धमेंद्र असंही म्हणतात, "लोकांनी मला एवढं प्रेम दिलं आहे की, मला लोकांबद्दल काहीही तक्रार नाही".
कबड्डीवर आधारीत चित्रपट बदलापूर बॉईजचं म्यूझिक लॉन्च करण्यात आलं, यावेळी धमेंद्र यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, तेव्हा धमेंद्र बोलत होते. धमेंद्र आता लवकरच सेकेण्ड हजबण्ड चित्रपटात दिसणार आहेत, धमेंद्र यावेळी एक हसतखेळत राहणाऱ्या वयस्कर माणसाची भूमिका करणार साकारणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.