'फायण्डिंग फेनी'च्या जाळ्यात 'मेट्रोसिटीचे प्रेक्षक' सापडले

दीपिका पदुकोणची महत्वाची भूमिका असलेला चित्रपट फायण्डिंग फेनीने तिकीट बारीवर पहिल्या दिवसापासूनच गर्दी खेचायला सुरूवात केली आहे. दीपिकाच्या फायण्ड़िंग फेनीने  पहिल्या दिवशी आठ कोटीचा गल्ला जमवलाय. 

Updated: Sep 14, 2014, 02:20 PM IST
'फायण्डिंग फेनी'च्या जाळ्यात 'मेट्रोसिटीचे प्रेक्षक' सापडले title=

मुंबई : दीपिका पदुकोणची महत्वाची भूमिका असलेला चित्रपट फायण्डिंग फेनीने तिकीट बारीवर पहिल्या दिवसापासूनच गर्दी खेचायला सुरूवात केली आहे. दीपिकाच्या फायण्ड़िंग फेनीने  पहिल्या दिवशी आठ कोटीचा गल्ला जमवलाय. 

नसरूद्दीन शहा यांच्यासारखे दिग्गज कलाकारांनीही या सिनेमात भूमिका साकारली आहे. पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्याही अभिनयाची उत्तम साथ या चित्रपटाला लाभली आहे. अर्जुन कपूरच्याही भूमिकेची वाह वा होतेय.

फायण्डिंग फेनीसोबत बिपाशाचा सिनेमा क्रिएचर थ्री डी देखिल रिलीज झालाय, मात्र फायण्डिंग फेनीच्या मानाने या चित्रपटाला अजून तरी मोठा प्रतिसाद लाभलेला नाही. 
 
पहिल्या दिवशी फायण्डिंग फेनी केवळ 500 सिनेमागृहात रिलीज़ झाला आहे. दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात असली, तरी हा कमी पैशात साकारलेला चित्रपट आहे. या फिल्मचा मुख्य उद्देश हा मल्टीप्लेक्स आणि मेट्रोसिटीच्या प्रेक्षकांना टार्गेट करण्याचा आहे. फायण्डिंग फेनी हा चित्रपट गोव्याच्या लोकेशनवर तयार झाला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.