मुंबई : अभिनेता सलमान खानला छायाचित्रकार यांनी चांगलाच दणका दिला आहे. सल्लूचे कोणतेही कार्यकक्रम कव्हर न करण्याचा निर्णय घेतलाय. आगामी बिग बॉस -८ च्या सिजनसाठी आयोजित कार्यक्रमावर छायाचित्रकारंनी बहिष्कार टाकून सल्लूला इशारा दिलाय.
सलमानने छायाचित्रकारांना छाया घेण्यापासून रोखले होते. त्यामुळे सर्व छायाचित्रकारांनी त्याचावर बहिष्कार टाकण्याचे हत्यार उपसले. त्यानुसार बिग बॉस-८ च्या कार्यक्रमाला चक्क दांडी मारली. त्यामुळे कार्यक्रम आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, छायाचित्रकारांच्या या बहिष्कारानंतर दबंगिरी करणाऱ्या सलमान चांगलाच ताळ्यावर आला. त्याने याबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. फोटोग्राफर्सबरोबर माझे नेहमी चांगले संबंध राहिले आहेत, असे त्यांने सांगितले.
मी कोणालाही माझे फोटो काढण्यापासून रोखलेले नाही. उलट त्यांनी माझे फोटो काढण्यावर बंदी घातली आहे. माझे फक्त ऐवढेच म्हणणे आहे की, त्यांनी फोटो काढताना माझ्या कार्यक्रमात गोंधळ न घालता अगदी शांतपणे माझे फोटो काढावेत, असे सल्लूने सांगितले. त्यानंतर फोटोग्राफर्सबरोबर माझे चांगले संबंध निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात का? असा प्रश्न विचारता सलमानं यावर उत्तर दिले, मला त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.