मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या दंगलने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई केली आहे. दंगलने अनेक विक्रम मोडत 28 दिवसांनतरही हाऊसफूलचा बोर्ड कायम ठेवला आहे. सिनेमा रिलीज झाल्यानंतर चार आठवड्यात दंगलने 375 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. दंगलने शुक्रवारपर्यंत 376.14 कोटीची कमाई केली आहे. दंगल आता 400 कोटींचा टप्पा गाठतो का हे पाहावं लागणार आहे.
23 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या दंगल चित्रपटात आमीर खान सोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि साक्षी तंवर हे मुख्य भूमिकेत आहेत. दंगल सिनेमाने पहिल्या पाच दिवसात 155 कोटींची कमाई केली तर 100 कोटींचा टप्पा तीन दिवसांमध्ये गाठला. आमीर खानने सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांकडून सिनेमाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.