मुंबई : कॉमेडी नाइट्सवरून वाद क्षमण्याचा चिन्ह दिसत नाही. पैसे हा मुद्दा नाही इतर कारणांमुळे कपिलचा शो बंद केल्याचा दावा कलर्स चॅनलने केला आहे.
कपिल शर्मा आठवड्यातून एक शो करायचा पण दोन शोचे पैसे मागायचा.
कलर्स चॅनल कपिलला हे अधिकचे पैसे देण्याचे मान्यही केले होते. पण हा स्टॅंडअप कॉमेडीयन चॅनलची इतर मार्गांनी छळवणूक करत असल्याचा दावा चॅनलने केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा शुटिंगच्या डेट्सवरूनही खूप प्रॉब्लेम क्रिएट करत होता. तसेच डेट्स दिल्या तर तो खूप लेट सेटवर पोहचत होता. कधीकधी पाच तास लेट पोहचत असे. शोला लाइव्ह ऑडिअन्स असल्याने खूप मोठा प्रॉब्लेम होत असे.