हर्ष आणि आपल्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणतेय भारती...

हर्षसोबत आपल्या लग्नाच्या चर्चांबद्दल कॉमेडीयन भारती सिंह हिनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. 

Updated: Dec 26, 2015, 04:23 PM IST
हर्ष आणि आपल्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणतेय भारती...  title=

नवी दिल्ली : हर्षसोबत आपल्या लग्नाच्या चर्चांबद्दल कॉमेडीयन भारती सिंह हिनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. 

गेल्या काही दिवसांपासून कॉमेडी लेखक हर्ष  लिंबाचिया आणि कॉमेडीयन भारती सिंह यांच्या लग्नाच्या चर्चांणा जोरदार उधाण आलं होतं. परंतु, या चर्चा केवळ अफवा असल्याचं भारतीनं म्हटलंय. 

माझं लग्न झालं तर मी ते लपवणार का? असं म्हणत मी लग्न केलंच तर तशी औपचारिक घोषणाही करेल असं भारतीनं म्हटलंय. 


भारती आणि हर्ष

हर्षबद्दल बोलताना, आपले तीन खास मित्र आहेत आणि हर्षदेखील त्यापैंकीच एक आहे... एकत्र काम करत असल्यामुळे आम्ही अनेकदा एकमेकांसोबत फोटो काढतो... आणि अधिकाधिक वेळ घालवतो... म्हणूनच लोकांचा हा गैरसमज झाला असेल असं भारतीनं म्हटलंय. 

शिवाय, आपल्या बोटांत दिसलेली अंगठी आपण स्वत:च्या पैशांनी खरेदी केलीय ती आपल्याला कोणत्याही पुरुष मित्रानं भेट म्हणून दिलेली नाही, असंही तीनं स्पष्ट केलंय. 

सध्या भारती 'कॉमेडी नाईटस बचाओ' या कार्यक्रमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.