कॉमेडी क्वीन भारती सिंग रुग्णालयात

कॉमेडी क्वीन भारती सिंग हिच्या छातीत दुखत असल्याने तिला येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

Updated: Jun 2, 2016, 03:48 PM IST
कॉमेडी क्वीन भारती सिंग रुग्णालयात title=
सौजन्य : सोशल मीडिया

मुंबई : कॉमेडी क्वीन भारती सिंग हिच्या छातीत दुखत असल्याने तिला येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर भारतीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे वृत्त पसरले. त्यानंतर भारतीच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. 

सध्या तिची प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती भारतीच्या कुटुंबियांनी दिली.

दरम्यान, भारती सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या ‘रिआलिटी शो’चे सुत्रसंचलन करत आहे. याशिवाय, ‘कॉमेडी नाईट्स’ आणि ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मध्येही ती काम करत आहे.