शॉर्ट ब्रेकनंतर सीआयडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

सोनी चॅनेलवरील प्रसिद्ध सीआयडी टीव्ही शो गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर दिसत नाहीये. त्यामुळे हा शो बंद झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र हा शो लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्टीकरण खुद्द सीआयडीमधील एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांनी दिलेय. 

Updated: May 26, 2016, 10:39 AM IST
शॉर्ट ब्रेकनंतर सीआयडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस title=

मुंबई : सोनी चॅनेलवरील प्रसिद्ध सीआयडी टीव्ही शो गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर दिसत नाहीये. त्यामुळे हा शो बंद झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र हा शो लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्टीकरण खुद्द सीआयडीमधील एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांनी दिलेय. 

गेल्या महिन्यात जेव्हा कपिल शर्माचा शो २३ एप्रिलपासून सुरु झालाय तेव्हापासून सीआयडीचे शो टेलिकास्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे सीआयडी पाहणाऱ्या फॅन्समध्ये नाराजी होती. मात्र सीआयडीच्या प्रेक्षकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

येत्या ४ जूनपासून सीआयडी शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पुढील महिन्यांपासून सीआयडी टीव्हीवर सुरु होईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात हा शो सुरु होईल, अशी माहिती साटम यांनी दिली. 

२१ जानेवारी १९९८ पासून सीआयडी हा टीव्ही शो सुरु झाला. तेव्हापासून आजपर्यंत या शोला प्रेक्षकांची पसंती कायम आहे.