'चिडीयाघर'च्या 'मेंढक'चा अपघात; ब्रेन हॅमरेजमुळे परिस्थिती गंभीर

सब टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'चिडीयाघर' या कार्यक्रमात 'मेंढक प्रसाद'ची भूमिका साकारणारा बालकलाकार मनीष विश्वकर्मा याचा गंभीर अपघात झालाय. 

Updated: Jul 1, 2015, 01:51 PM IST
'चिडीयाघर'च्या 'मेंढक'चा अपघात; ब्रेन हॅमरेजमुळे परिस्थिती गंभीर title=

नवी दिल्ली : सब टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'चिडीयाघर' या कार्यक्रमात 'मेंढक प्रसाद'ची भूमिका साकारणारा बालकलाकार मनीष विश्वकर्मा याचा गंभीर अपघात झालाय. 

मनिष सध्या मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आपल्या बाईकवरून शुटींगसाठी निघाला होता. आरे कॉलनीजवळ त्याच्या बाईकची धडक एका कारसोबत झाली आणि हा अपघात झाला.

या दुर्घटनेत मनीष गंभीर जखमी झालाय. गेल्या ४८ तासांपासून तो डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, मनीषचं ब्रेन हॅमरेज झालंय. ज्यामुळे, त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी जमल्यात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मनीषवर योग्य ते उपचार सुरू आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.