'छत्रपती शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत.

Updated: Dec 26, 2015, 12:52 PM IST
'छत्रपती शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार title=
सौजन्य : ट्विटर

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. अभिनेता रितेश देशमुखने ट्विरद्वारे याबाबतची घोषणा केलीय.

मुंबई फिल्म कंपनीचा चित्रपट असलेल्या छत्रपती शिवाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार असल्याची घोषणा करण्यास मला खूप अभिमान वाटत असल्याचे रितेशने ट्विटरवर म्हटलेय. 

या चित्रपटात रितेश मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख या चित्रपटाची निर्मिती करतेय.