श्वेता बासू प्रसादची पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री...

छोट्या पडद्यावर 'कहानी घर घर की' या कार्यक्रमातून प्रेक्षकांची लाडकी बनलेली अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री करतेय. 

Updated: Sep 10, 2016, 07:44 PM IST
श्वेता बासू प्रसादची पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री...  title=

मुंबई : छोट्या पडद्यावर 'कहानी घर घर की' या कार्यक्रमातून प्रेक्षकांची लाडकी बनलेली अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री करतेय. 

'मकडी' या सिनेमासाठी श्वेताला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली होता. परंतु, २०१४ साली हैदराबादमध्ये एका सेक्स रॅकेटशी नाव जोडलं गेल्यानं श्वेतानं तुरुंगवासही भोगला... परंतु, नंतर मात्र तिला सत्र न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली. 

यानंतर श्वेता दीर्घकाळ स्क्रीनपासून दूर आहे. आता मात्र, 'चंद्र नंदिनी' या ऐतिहासिक कथेवर आधारित असलेल्या मालिकेतून श्वेता पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी येतेय.