'चला हवा येऊ द्या'मध्ये आल्या 'जॅकसन मायलेक'

 झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात यंदा मायलेकींच्या जोड्या आपल्याला दिसणार आहेत. 

Updated: Nov 26, 2016, 07:33 PM IST

मुंबई :  झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात यंदा मायलेकींच्या जोड्या आपल्याला दिसणार आहेत.  ज्योती चांदेकर-तेजस्विनी पंडित, आरती अंकलीकर टीकेकर-स्वानंदी टीकेकर, सुवर्णा माटेगावकर - केतकी माटेगावकर आणि मीना नाईक -  मनवा नाईक या मायलेकींच्या जोड्या येत्या सोमवारी प्रदर्शित होणाऱ्या चला हवा येऊ द्या कार्यक्रमात दिसणार आहे. 

झी मराठी चॅनल आता HD झाले असून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम तुम्ही सोमवार-मंगळवार रात्री ९.३० वाजता झी मराठी HD वरही पाहता येणार आहे. 

बातमीच्या खाली व्हिडिओ आहे

या वेळी थुकरटवाडीचे सरपंच भारत गणेशपुरे यांनी तेजस्विनी पंडित आणि ज्योती चांदेकर यांची विशेष ओळख करून दिली. 

पाहू या भारत गणेशपुरेंचा हा स्पेशल व्हिडिओ...