सलमानला सेलिब्रिटींचा ट्विटरवरून पाठिंबा

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला हिट अँड रन केसमध्ये दोषी ठरविण्यात आले असून त्याला ५ वर्ष तुरूंगवास आणि २५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

Updated: May 6, 2015, 03:37 PM IST
सलमानला सेलिब्रिटींचा ट्विटरवरून पाठिंबा title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला हिट अँड रन केसमध्ये दोषी ठरविण्यात आले असून त्याला ५ वर्ष तुरूंगवास आणि २५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

कोर्टात शिक्षा सुनावल्यावर सलमान खानला रडू कोसळले. सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर बॉलिवूडच्या काही अभिनेत्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहू या कोण काय म्हणाले. 

आलिया भट्ट
तुमचे जवळचे चुकीचे जरी असले तरी त्यांना शिक्षा झाली तर खूप वाईट वाटते. पण आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासोबत कायम आहे. 

ऋषि कपूर 
या कठीण प्रसंगी कपूर कुटुंबीय खान कुटुंबियांसोबत आहे. काळ हा सर्व घाव दूर करतो, गॉड ब्लेस

सोनाक्षी सिन्हा 
धक्कादायक बातमी... काय बोलावे हे कळत नाही. पण सलमान खान सोबत आम्ही कोणत्याही परिस्थिती आहोत. तो चांगला माणूस आहे 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.