काळवीट शिकार प्रकरण, सलमानची निर्दोष सुटका

काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खानला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय.

Updated: Jul 25, 2016, 11:05 AM IST
काळवीट शिकार प्रकरण, सलमानची निर्दोष सुटका title=

जयपूर : काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खानला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय.

राजस्थानतल्या काळविटाच्या शिकारीप्रकरणी सलमान खानची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. राजस्थान उच्च न्यायालयाने याप्रकरणी आज सकाळी निकाल दिला.  

सत्र न्यायालयानं सलमानला या प्रकरणी पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा केली होती. त्याविरोधात सलमानने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. 

१९९८मध्ये 'हम साथ साथ है'च्या शूटिंगदरम्यान सलमानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. याप्रकरणी खटला सुरु होता. अखेर १८ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागलाय.