BOX OFFICE: 'मेरी कोम' नं कमावले 53 कोटी!

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा चित्रपट ‘मेरी कोम’नं आतापर्यंत एकूण 53.5 कोटी रुपयांची कमाई केलीय. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 8.4 कोटी कमावले होते. 

Updated: Sep 16, 2014, 04:15 PM IST
BOX OFFICE: 'मेरी कोम' नं कमावले 53 कोटी!   title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा चित्रपट ‘मेरी कोम’नं आतापर्यंत एकूण 53.5 कोटी रुपयांची कमाई केलीय. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 8.4 कोटी कमावले होते. 

ओपनिंग विकेंडला फिल्मनं 30.6 कोटींची कमाई केली. याशिवाय एका आठवड्यात 46 कोटी रुपये कमावले आणि एकूण आतापर्यंत 53.5 कोटींची कमाई चित्रपटानं केलीय. 

5 सप्टेंबरला ही फिल्म रिलीज झाली. चित्रपट ‘फाइंडिंग फॅनी’ आणि ‘क्रीचर थ्री’ रिलीज झाल्यानंतर मेरी कोमच्या कमाईवर काहीही परिणाम झाला नाहीय आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. 

तर गेल्या शुक्रवारी दीपिका पादुकोण आणि अर्जुन कपूरचा चित्रपट ‘फाइंडिंग फॅनी’ रिलीज झालाय. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 5.1 कोटींची कमाई केली. तर विकेंडमध्ये 19.9 कोटी कमावले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.