मुंबई: मल्लिका शेरावत आणि वाद याचं खूप जवळचं नातं आहे. मात्र काही काळापासून वादापासून दूर राहिलेली मल्लिका पुन्हा आपल्या 'द डर्टी पॉलिटिक्स' चित्रपटाद्वारे चर्चेत आलीय. राजस्थानच्या भवरी देवी हत्याकांडावर आधारित हा चित्रपट आहे. या फिल्मचे डायलॉग खूप बोल्ड आहेत.
चित्रपटाचं गाणं 'मेरे घाघरे के पिछे घमासान मची है' सध्या खूप धूम माजवतोय. एवढंच नव्हे तर फिल्मचे डायलॉग पण खूप धमाकेदार आहे.
चित्रपटात मल्लिका आणि ओम पुरी यांच्यात एक इंटिमेट सीनही चित्रित केलाय. १३ फेब्रुवारीला चित्रपट रिलीज होणार आहे. याचा ट्रेलर खूप दमदार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.