बिपाशा पाण्यात बुडता-बुडता वाचली

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू पाण्याला खूप घाबरते, कारण तिला पाण्यात पोहता येत नाही, बॉम्बे टाईम्स दिलेल्या बातमीनुसार बिपाशा हॉरर चित्रपट 'अलोन'चं शुटिंह करत होती. शुटिंग केरळच्या बॅकवॉटर्समध्ये होती, आणि शुटिंग दरम्यान बिपाशा आपला को स्टार करण सिंह ग्रोवरच्या मागे जेट स्कीवर बसलेली होती.

Updated: Dec 8, 2014, 06:27 PM IST
बिपाशा पाण्यात बुडता-बुडता वाचली title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू पाण्याला खूप घाबरते, कारण तिला पाण्यात पोहता येत नाही, बॉम्बे टाईम्स दिलेल्या बातमीनुसार बिपाशा हॉरर चित्रपट 'अलोन'चं शुटिंह करत होती. शुटिंग केरळच्या बॅकवॉटर्समध्ये होती, आणि शुटिंग दरम्यान बिपाशा आपला को स्टार करण सिंह ग्रोवरच्या मागे जेट स्कीवर बसलेली होती.

बिपाशा या सर्व प्रकाराला घाबरली होती तरीही ती शुटिंग करण्यास राजी झाली, एका ठिकाणी करनला टर्न घ्यावा लागणार होता. करण वळला, आणि जेट स्की उलटली आणि बिपाशा पाण्यात पडली आणि बुडायला लागली..

यावेळी सर्व टीम पाण्यात दूर अंतरावर होती, बिपाशा बुडतेय हे पाहून करनने पाण्यात उडी मारली आणि तिला वाचवलं. बिपाशाला दुसऱ्या बोटने किनाऱ्यावर आणण्यात आलं, बिपाशाला दोन तासात बरं वाटलं, सेटवरील टीमने टाळ्या वाजवून करण सिंह ग्रोवरचं कौतुक केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.