बिपाशाच्या लग्नात अचानक समोर आला तिचा एक्स-बॉयफ्रेंड

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री बिपाशा बसूचा लग्न सोहळा पार पडला. करन सिंह ग्रोवर सोबत काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या बिपाशाच्या लग्नाला अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली.

Updated: May 4, 2016, 05:07 PM IST
बिपाशाच्या लग्नात अचानक समोर आला तिचा एक्स-बॉयफ्रेंड title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री बिपाशा बसूचा लग्न सोहळा पार पडला. करन सिंह ग्रोवर सोबत काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या बिपाशाच्या लग्नाला अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली.

बिपाशा बसूला धक्का तेव्हा लागला असेल जेव्हा तिचा एक्सबॉयफ्रेंड डिनो मोरिया हा तिच्या लग्नात पोहोचला. दोघांनी बॉलिवूडमध्ये एकत्र करिअरला सुरुवात केली. राज या सिनेमामध्ये दोघांमध्ये जवळीकता वाढली होती.

ब्रेकअपनंतर डिनो मोरिया आणि बिपाशा बसू लग्नामध्येच एकत्र दिसले. डिनोने बिपाशा आणि करन सिंह ग्रोवरसोबत फोटोही काढले आणि त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

बिपाशा आणि करन यांच्या रिसेप्शनमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान सारखे दिग्गज ही उपस्थित होते. शिवाय अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, रितेश आणि जेनेलिया देशमुख, प्रीती जिंटा, मलाइका अरोडा, संजय दत्त आणि रणबीर कपूर ही उपस्थित होते.