मुंबई: 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांसाठी आजचा पहिला दिवस... आज सर्व जण आपल्याला थकलेले आणि आराम करतांना दिसणार आहे. पण सोबतच बिग बॉसचा पहिला धक्का स्पर्धकांना बसणार आहे.
'बिग बॉस'च्या घरी घोषणा होईल सर्व जोडींमध्ये प्रत्येक जोडीतील एकाच सदस्याचं सामान मिळणार आहे. इतरांना आपल्या बॅग शिवाय राहावं लागेल. त्यांना सांगण्यात येईल की, ते एकमेकांसोबत चर्चा करून ठरवावं आणि कुणाचं नाव सामानासाठी द्यायचं. त्यामुळं जवळपास अधिकाधिक पुरुषांनी आपल्या सामानासोबत समझौता करत महिला सदस्यांचं सामान मागवलं. इतरांच्या बॅग्ज त्यांच्याच समोर तोडण्यात आल्या. ते पाहून रूपल आणि किश्वर रडायला लागल्या.
आणखी वाचा - 'Bigg Boss 9'ची धमाकेदार सुरूवात, पाहा कोणती जोडी सर्वात हॉट?
घरातील सदस्य एकमेकांना जोडलेले असणार आहेत. दिवसाची सुरूवात 'ये दोस्ती हम नही तोडेंगे..' या गाण्यानं होईल. घरातील सर्व सदस्य एकमेकांबद्दल बोलतांना दिसतील. अमन आणि किश्वर म्हणतील किथ आणि रॉशेल जेव्हा बसून बोलत होते, तेव्हा प्रिंस किती बोअर दिसत होता. घरातील सदस्यांना आज किराणा मिळेल. पुरुष किचनमध्ये काम सांभाळतील आणि कोणतीही महिला सदस्याला चांगलं जेवण बनवता येत नाही.
घरातील सदस्यांना काम वाटून देण्यात येईल. अमन-युविकासोबत लंच बनवतांना दिसेल. तर प्रिंसही जेवण बनवतांना दिसेल. तेवढ्यातच बिग बॉसचा मोठा बॉम्ब पडेल. कोणत्या तरी एका जोडीला नॉमिनेट करावं लागेल. काही सदस्य ठरवून टाकतील तर काही जणं चर्चा करतील.
आणखी वाचा - Confirmed list:'बिग बॉस ९'मधील स्पर्धकांची नावं!
एकेकाळी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असलेले अंकित आणि रुपल एकमेकांपासून दूर दिसतील. रुपल म्हणेल अंकित अॅक्टिंग करतोय आणि तो असा रिअलमध्ये नाहीय. रॉशेल आणि कीथ हळुहळू बोलतांना दिसतील. रॉशेल कीथला सांगेल की, प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. ती म्हणते, तिला आपलं वागणं आणि मंदानासोबत त्याच्या वागण्याबद्दल सांभाळून राहावं लागेल. अरविंदला त्याच्या घोरण्यामुळं खूप काही ऐकावं लागेल.
या आहेत बिग बॉसच्या जोड्या -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.