बिग बॉस ९ : शॉकिंग... रिमी सेन आज रात्री शोमधून बाहेर पडणार

बिग बॉस ९ च्या एलिमिनेशनमध्ये आज रात्री सर्वात धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे. शो मधील सर्वात अनुत्साही सदस्य रिमी सेन हिला बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Updated: Nov 30, 2015, 10:10 AM IST
बिग बॉस ९ :  शॉकिंग... रिमी सेन आज रात्री शोमधून बाहेर पडणार  title=

मुंबई : बिग बॉस ९ च्या एलिमिनेशनमध्ये आज रात्री सर्वात धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे. शो मधील सर्वात अनुत्साही सदस्य रिमी सेन हिला बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

ज्या सदस्याला घराबाहेर जायचे आहे त्याने खुशाल जावे, असे सांगून बिग बॉसने आपल्या घराचे दरवाजे उघडले केले होते. पण सात आठवड्यापासून घरात असलेल्या आणि घरात राहण्याची इच्छा नाही असे वेळोवेळी सांगणाऱ्या रिमी सेन हिने घर सोडले नव्हते. 

रिमी सेन हिने बहुतांशी टास्कमध्ये आपला सहभाग दाखविला नव्हता. पण प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर ती अनेक दिवस घरात टिकून होती. पण तिची माघार घेण्याची वृत्ती ही तिला, सदस्यांना आणि शो च्या प्रोड्युसरला अडचणीत टाकत होती. 

तिला इन्टरटेन्मेंट व्हॅल्यू नसली तरी बिग बॉसचे प्रो़ड्युसर तिच्याशी केलेल्या करारामुळे काढू शकत नव्हते. ती स्वतःहून गेली असती तर २ कोटीच्या या करारातून फक्त २० टक्के रक्कम तिला द्यावी लागली असती. पण तिला एलिमिनेट केले असते तर सर्वच्या सर्व पैसे रिमीला द्यावे लागणार होते. त्यामुळे इतक्या दिवस ती शोमध्ये टीकून होती. 

सलमान खान यानेही तिला टाक्समध्ये भाग घेण्यासंबंधी अनेक वेळा सांगितले होते. पण तिने कधीच आपला अॅटिट्यूट बदलला नाही. शोच्या प्रोड्युसरने तिचे घरातील आयुष्य आणखी वाईट करण्याचा प्रयत्न केला, पण रिमीने स्वतःहून घर सोडले नाही. 

रिमीला विजयी करण्याचा विचार बिग बॉस होतो. पण प्रेक्षकांच्या मतांनी तिला घरातून बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या खऱ्या विजेत्यालाही रक्कम मिळणार नाही इतकी २ कोटी रक्कम रिमी सेनला द्यावी लागणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.