शूटिंगरदरम्यान अभिनेत्री मोना सिंगला अपघात

'प्यार को हो जाने दो' या टिव्ही शोमध्ये प्रीतची भूमिका साकारत असलेल्या मोना सिंगलाही शूटिंगदरम्यान अपघात झाल्याने ती जखमी झालीये. एका सीनच्या शूटिंगदरम्यान मोनाच्या चेहऱ्यावर गरम मेण पडल्याने तिच्या चेहऱ्यावर जखम झालीये. 

Updated: Nov 29, 2015, 12:44 PM IST
शूटिंगरदरम्यान अभिनेत्री मोना सिंगला अपघात title=

मुंबई : 'प्यार को हो जाने दो' या टिव्ही शोमध्ये प्रीतची भूमिका साकारत असलेल्या मोना सिंगलाही शूटिंगदरम्यान अपघात झाल्याने ती जखमी झालीये. एका सीनच्या शूटिंगदरम्यान मोनाच्या चेहऱ्यावर गरम मेण पडल्याने तिच्या चेहऱ्यावर जखम झालीये. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान मेणबत्ती विझवताना गरम वितळलेले मेण मोनाच्या चेहऱ्यावर पडले. यानंतर लगेचच डॉक्टरांना बोलावण्यात आले. 

याबाबत बोलताना, सीन दरम्यान माझ्या चेहऱ्याला दुखापत झाली. मात्र लगेचच डॉक्टरांना बोलावण्यात आले. आता मी ठीक आहे. चेहऱ्यावर जखमेचे काही व्रण आहेत, असे मोना म्हणाली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.