बिग बॉस ८ मध्ये नवीन सदस्याचा विमान प्रवेश

Updated: Sep 27, 2014, 02:57 PM IST
बिग बॉस ८ मध्ये नवीन सदस्याचा विमान प्रवेश title=

मुंबई : बिग बॉसचा पाचवा दिवस हा तसा गंमतीशीर असेल. प्रवाशांसाठी स्वंयपाक घर उघडल्यापासून वादला तोंड फुटले आहे. आता अजून पुढे काय काय होईल, याची उत्सुकता लागली आहे.

वादाची ठिणगी –

प्रवाशांसाठी स्वंयपाक घर आहे. स्वंयपाक घरात वाद सतत वाढच आहेत. काही दिवसांपासून करिष्मा आणि डियंड्रा या दोघींचे स्वंयपाक घरात वर्चस्व दिसून येत आहे. प्रणितचा स्वंयपाक घरातील प्रवेश डियंड्राला अजिबात आवडलेला नाही. प्रणितला डियंड्रा मुळीच पसंत नाही.

सिक्रेट सोसायटी सदस्याचा विमानात प्रवेश -

बिग बॉसने सिक्रेट सोसायटीच्या सदस्यांना एक टास्क दिला. त्यामध्ये त्यांच्यापैकी एक कमकुवत सदस्याला बाकीच्या प्रवाशांबरोबर विमानात पाठविण्यासाठी त्यांची निवड करायची होती, तेव्हा त्यांनी पुनीत इस्सरची निवड केली. विमानात राहाण्यासाठी गेल्यानंतर त्यांचे सिक्रेट सोसायटीच्या सदस्याचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. दीपशिखा आणि प्रितम हे दोघांचे सिक्रेट सोसायटीच्या सदस्यांचे अधिकार कायम राहिले आहेत.

पुनित इस्सराचा विमानात प्रवेश –

 

प्रवेश होण्याआधी काळोख करण्यात आला. प्रवाशांमध्ये सस्पेन्स वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ‘रक्त चरित्र’ या गाण्याच्या तालावर पुनित इस्सराचा विमानात प्रवेश केला. सर्व प्रवाशांनी आनंदाने त्याचे स्वागत केले. पुनितने विमानातील प्रत्येक सदस्यांना महाभारतमधील व्यक्तीरेखाशी जोडण्यांचा प्रयत्न केला. उपेन पटेल याला अर्जुन, गौतमला करण, आर्य याला भीम, सुशांतला नकुल आणि प्रणितला युधिष्ठिर म्हटले. तर स्वतःला भीष्म पितामह घोषित केले.

विमानात पहिला वाढदिवस –

बिग बॉसच्या विमानात पहिल्यांदा प्रवाशाचा वाढदिवस साजरा करण्याची संधी आली. रात्री १२ वाजता प्रणितचा वाढदिवस प्रवाशांनी साजरा केला. तेव्हा प्रणित हा त्याच्या बिझनेस क्लासच्या सुविधा असलेल्या विमानातील बाकी सदस्यांसोबत शेअर करण्याची विंनती सिक्रेट सोसायटीतील सदस्यांना करत असताना त्याचेवेळी त्याच्या आईचा आवाज ऐकू आल्यानंतर तो भावूक झाला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.