VIDEO : ‘सैराट’मधील ही चूक तुम्हाला माहित आहे का?

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चे गारुड तरुणाईवर झाले. हा सिनेमा बघताना तरुण पिढी दंगून जाते. तर झिंग झिंग झिंगाट गाण्याने सर्वच जण सैराट झालेत. या सिनेमात एक चूक झालेय. ती कोणाच्याही लक्षात आलेली नाही.

Updated: Jul 6, 2016, 04:11 PM IST
VIDEO : ‘सैराट’मधील ही चूक तुम्हाला माहित आहे का? title=

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चे गारुड तरुणाईवर झाले. हा सिनेमा बघताना तरुण पिढी दंगून जाते. तर झिंग झिंग झिंगाट गाण्याने सर्वच जण सैराट झालेत. या सिनेमात एक चूक झालेय. ती कोणाच्याही लक्षात आलेली नाही.

‘सैराट’ या सिनेमातील एक चूक दाखविणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सल्या आणि प्रदीपसह परश्या आर्चीला शेतात भेटायला जातो, या दृश्यात सल्याचा शर्ट बदललेला पाहायला मिळतो. गंमत म्हणजे बदललेला हा शर्ट आणि अन्य एका दृश्यात पराश्याने परिधान केलेला शर्ट सारखाच आहे.  

पाहा हा व्हिडिओ :